भाजीपाला दरात पुन्हा एकदा घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:52+5:302021-01-25T04:27:52+5:30

सांगली : गायब झालेल्या थंडीचे पुन्हा एकदा आगमन झाल्याने गारठा वाढत असतानाच, भाजीपाल्यांचीही आवक वाढू लागली आहे. उत्पादन वाढल्याने ...

Once again the price of vegetables fell | भाजीपाला दरात पुन्हा एकदा घट

भाजीपाला दरात पुन्हा एकदा घट

Next

सांगली : गायब झालेल्या थंडीचे पुन्हा एकदा आगमन झाल्याने गारठा वाढत असतानाच, भाजीपाल्यांचीही आवक वाढू लागली आहे. उत्पादन वाढल्याने आठवडी बाजारात फळे, पाल्याभाज्यांना मागणीही चांगली आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा भाजीपाल्यांच्या दरात घट झाली आहे. फळांची आवक समाधानकारक असून, संत्र्यांबरोबरच आता स्ट्राॅबेरीचीही आवक वाढत आहे.

किराणा मालाच्या दरात होत असलेली वाढ स्थिर झाली असलीतरी धान्ये, कडधान्यांच्या दरात वाढ झाली आहे. तांदळाचे स्थिर झालेल्या दरात ५ ते १५ रुपयांनी वाढ झाली आहे. गहू, ज्वारीेचेही दर वाढले आहेत. प्रति क्विंटल २८०० ते २९०० रुपये गव्हाचे दर वाढून आता तीन हजार २०० रुपयांवर दर गेले आहेत, ज्वारीचेही दर पाच रुपयांनी वाढून ३५०० ते ४३०० रुपये प्रतीक्विंटल दर झाला आहे. नवीन गहू बाजारात आल्यानंतरच दर काहीसे कमी होतील असे अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

आठवडी बाजारात भाज्यांची आवकही चांगली असून, दर स्थिर झाल्याने ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. या आठवड्यात गाजराची आवक वाढल्याने दर काही कमी झाले होते. करडई, चाकवत भाजी मिळत आहे.

चौकट

स्ट्रॉबेरी आली

महाबळेश्वरसह देशाच्या इतर भागांतील लाल चुटूक स्ट्रॉबेरीची फळ मार्केटमध्ये आगमन झाले आहे. ७० ते १२० रुपये बॉक्सची किंमत आहे. शहरातील बहुतांश फळविक्रेत्यांकडे स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली आहे. याशिवाय कलिंगड, पेरू, संत्रीलाही मागणी चांगली आहे.

चौकट

पालेभाज्यांना मागणी

या आठवड्यात पालेभाज्यांची चांगली आवक होती. त्यातही मेथी, पालक या नियमित भाज्यांसह चाकवत, करडईची उपलब्धता वाढत आहे.

चौकट

तेल स्थिर, धान्य दरात वाढ

महिनभरापासून खाद्यतेलाच्या दराचा भडका ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे दरात मोठी वाढ झाली आहे. या आठवड्यात तेलाचे दर कायम राहीले असलेतरी धान्यांच्या दरात सरासरी वाढ झालेली आहे.

कोट

संक्रांतीनंतर पालेभाज्या जादा बाजारात येतात. त्यामुळे दर कमी असल्याने ग्राहक म्हणून समाधान आहे. यापुढे आवक कमी होण्याची शक्यता असल्याने दरही वाढतील अशी भीती आहे. खाद्यतेलाची खरेदी करताना अजूनही हात आखडता घ्यावा लागत आहे.

सुरेखा चव्हाण, गृहिणी

कोट

मध्य प्रदेशातून येणाऱ्या गव्हाची मर्यादित आहे. त्यामुळे सध्यातरी दरवाढ कायमच असेल. नवीन गहू जरी बाजारात आलातरी दर कायम राहतील असा अंदाज आहे. सध्या उपलब्ध धान्याचा दर्जा मात्र, चांगला आहे.

प्रवीण पाटील, व्यापारी

कोट

या आठवड्यात फळांमध्ये संत्री, स्ट्रॉबेरीची आवक चांगली आहे. देशी पेरूही बाजारात येत आहेत. त्याचीही चांगली विक्री होत आहे. नेहमीप्रमाणे सफरचंद, संत्री, कलिंगडास मागणी आहे.

नारायण हाके, व्यापारी

Web Title: Once again the price of vegetables fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.