सोशल मीडियावर महिलेच्या बदनामीबद्दल एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:41+5:302021-07-14T04:32:41+5:30
शिराळा : तालुक्यातील विवाहित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याप्रकरणी प्रकाश बाजीराव कांबळे (वय ३५, रा.इंग्रुळ, ता.शिराळा) ...
शिराळा : तालुक्यातील विवाहित महिलेची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर टाकून बदनामी केल्याप्रकरणी प्रकाश बाजीराव कांबळे (वय ३५, रा.इंग्रुळ, ता.शिराळा) यास शिराळा पोलिसांनी अटक केली आहे. त्यास २६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीचा आदेश देण्यात आला आहे.
विवाहिता तालुक्ळातील एका गावातून महिन्यापूर्वी मुंबई येथे राहण्यास गेली आहे. प्रकाश कांबळे याने तिला, ‘व्हिडीओ कॉल करतो, तुला विवस्त्र पाहायचे आहे,’ असे सांगितले. तिने नकार दिला असता, त्याच्याकडील काही आक्षेपार्ह छायाचित्रे पतीला पाठविण्याची धमकी दिली. ती पुन्हा तिच्या गावाकडे येणार नसल्याचे दिसताच, प्रकाश कांबळे याने तिची आक्षेपार्ह छायाचित्रे सोशल मीडियावर टाकली. याबाबतची माहिती मुंबई येथे महिलेस कळल्यावर तिने शिराळा येथे येऊन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. संशयित कांबळेस अटक केली असून, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार तपास करीत आहेत.