वाळव्यात बाप-लेकांकडून एकाचा खून
By admin | Published: June 5, 2016 12:50 AM2016-06-05T00:50:51+5:302016-06-05T00:54:58+5:30
तिघेही फ रार : किरकोळ वादातून घडला प्रकार; आष्टा पोलिसांत फिर्याद दाखल
वाळवा : येथील कुंभार गल्लीच्या पाठीमागे चिवळ्या बजरंग पवार (वय ४०, रा. खुंदलापूर-चांदोली वसाहत, बोरगाव, ता. वाळवा) यांचा शनिवारी दुपारी त्याच वसाहतीमधील तिघा बाप-लेकांनी भोसकून खून केला. चिवळ्या पवार यांची पत्नी शित्ती पवार (३५) यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
बोरगाव येथील खुंदलापूर-चांदोली वसाहतीतील चिवळ्या पवार व तेथीलच झांजम्या कुस्तान्या पवार आणि त्यांची मुले कपिल झांजम्या पवार व महिनशहा झांजम्या पवार यांच्यात शनिवारी सकाळी अकरा वाजता किरकोळ कारणातून वाद झाला. त्यांच्यात हाणामारीही झाली. त्यानंतर चिवळ्या पवार पत्नी शित्तीसह वाळवा येथील त्यांचे चुलते गिलाट्या पवार यांच्याकडे आले. सकाळी झालेल्या वादात चिवळ््या पवार किरकोळ जखमी झाले होते. त्यामुळे वाळव्यातील रुग्णालयात जाण्यासाठी ते निघाले. यावेळी त्यांच्यापाठोपाठ झांजम्या पवार, कपिल पवार व महीनशहा पवार हे तिघे बापलेक गिलाट्या पवार यांच्या घरी आले. यावेळी चिवळ््या व त्यांची पत्नी तेथेच असल्याने त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. पुन्हा हाणामारी सुरू झाली. यावेळी तिघा बाप-लेकांनी चिवळ््या यांना जांबियाने भोसकले. वार वर्मी बसल्याने ते जागीच मृत झाले.
याबाबत आष्टा आणि इस्लामपूर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक वैशाली शिंदे, पोलिस निरीक्षक प्रताप पोमण यांनी घटनास्थळी जाऊन चिवळ्या यांना वाळवा आरोग्य केंद्रात दाखल केले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी झांजम्या पवार, कपिल पवार, महीनशहा पवार फरार आहेत. चिवळ्या पवार यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, पत्नी आहे. प्रताप पोमण पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)