विटा येथील शिवसंगम मार्ग पुलासाठी एक कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:31+5:302021-03-26T04:26:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा येथील तासगाव नाका तसेच शितोळे गल्ली परिसरातील नागरिकांना गैरसोयीच्या ठरणाऱ्या शिवसंगम मार्गावरील दोन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा येथील तासगाव नाका तसेच शितोळे गल्ली परिसरातील नागरिकांना गैरसोयीच्या ठरणाऱ्या शिवसंगम मार्गावरील दोन पुलांची उंची वाढवून रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी नगरपालिकेने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामाचे भूमिपूजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
विटा येथील शितोळे गल्ली, तासगाव नाकापासून शिवसंगम मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दोन्ही ओढ्यात पुलांची उंची फारच कमी आहे. एकदम खडा उतार असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत होती.
त्यामुळे या पुलांची उंची वाढवून रस्त्याचे रुंदीकरण करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या सूचनेनुसार माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी या कामासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी दलित वस्ती योजनेतून एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला. त्यासाठी माजी उपनगराध्यक्षा मालती कांबळे व नगरसेविका प्रगती कांबळे यांनी पाठपुरावा केला होता. या निधीतून ओढ्यावरील पुलांची उंची वाढविण्यासह रस्त्याचे रुंदीकरण व ओढ्याला आरसीसी रिटेनिंग केले आहे. या कामाचे भूमिपूजन भरत कांबळे, प्रशांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी हणमंत निरगुडे, छोट्या शितोळे, स्वप्निल इंगळे, अविनाश शिंदे, सुनील वस्त्रे, अमोल ढेरे, गजानन निकम, उमेश कुलकर्णी, अमोल इंगळे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.