कारखान्यांकडून ‘ताकारी’ची एक कोटीची पाणीपट्टी थकित

By admin | Published: November 7, 2014 10:54 PM2014-11-07T22:54:08+5:302014-11-07T23:36:04+5:30

वीज पुरवठा खंडित : रब्बी हंगामाबाबत साशंकता; शेतकरी चिंतेत

One crore water tank of 'Takaari' from the factories exhausted | कारखान्यांकडून ‘ताकारी’ची एक कोटीची पाणीपट्टी थकित

कारखान्यांकडून ‘ताकारी’ची एक कोटीची पाणीपट्टी थकित

Next

दिलीप मोहिते - विटा -साखर कारखान्यांनी २०१३-१४ च्या गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात केलेली ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची रक्कम कृष्णा खोरेकडे वर्ग केली नाही. पाणीपट्टीची थकित रक्कम सुमारे एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील ऊस गाळपासाठी सोनहिरा, केन अ‍ॅग्रो, क्रांती, उदगिरी कारखान्यांकडे पाठविला जातो. साखर कारखान्यांकडून ताकारी योजनेच्या पाणीपट्टीची आकारून आलेली रक्कम कपात करून ती पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली जाते. कपात केलेली पाणीपट्टीची रक्कम काही कारखान्यांकडे अजूनही पडून आहे. ही रक्कम सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत असल्याचा दावा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संजय डोईफोडे यांनी केला आहे.

वसुली सदोष
पाणीपट्टी वसुलीची यादी पाटबंधारे विभागाकडून सोनहिरा, क्रांती, केन अ‍ॅग्रो व उदगिरी साखर कारखान्यांकडे पाठविली जाते. ही यादी एकच असते. परंतु, शेतकऱ्यांचा ऊस यातील दोन-तीन कारखान्यांना गळितासाठी पाठविला जातो. मात्र, हे सर्वच कारखाने पाणीपट्टीची कपात करतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एकाच क्षेत्राची दोन-दोनवेळा पाणीपट्टी कपात होते.

पाणीपट्टी देणार
पाटबंधारे विभागाच्या मागणीप्रमाणे त्यांना पाणीपट्टीची रक्कम दिली जाते : मोहनराव कदम
वीज पुरवठा खंडित होण्याची प्रतीक्षा पाटबंधारे विभागाने का केली? वीज बिलासाठी रक्कम पाहिजे असल्यास मागणी केली तर आम्ही ती देऊ : अरुण लाड
कालव्यांच्या कामांची रक्कम सुमारे तीन कोटी पाटबंधारे विभागाकडून मिळाली नाही : जयकर पाटील

Web Title: One crore water tank of 'Takaari' from the factories exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.