फारणेवाडी येथे एकदिवसीय लसीकरण शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:08+5:302021-04-26T04:23:08+5:30
शिगाव : फारणेवाडी (शिगाव) ता. वाळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ढवळी व ग्रामपंचायत फारणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीमध्ये एक ...
शिगाव : फारणेवाडी (शिगाव) ता. वाळवा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, ढवळी व ग्रामपंचायत फारणेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीमध्ये एक दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिरामध्ये १०० लोकांना लस देण्यात आली. जे लोक आजारी किंवा चालता फिरता येत नाही अशा लोकांना या शिबिराचा फायदा झाला.
हे लसीकरण शिबिर पार पाडण्यासाठी सरपंच प्राजक्ता खोत, उपसरपंच सागर सिद, सर्व सदस्य, ग्रामसेवक सूरज फारणे, पोलीसपाटील सतीश देशमुख, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश साळुंखे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप गोरड, आरोग्य सहाय्यक के. बी. कदम, आरोग्यसेविका सी.एल. एडके, परिचर एम. आर. सतीप, आशासेविका मनीषा खोत, मनीषा पाटील, शीला कांबळे, अंगणवाडीसेविका संगीता पाटील, मदतनीस अंजना खोत, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब कांबळे, पांडुरंग खोत यांनी सहकार्य केले.