Sangli: वाळू काढताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 12:12 PM2024-11-14T12:12:17+5:302024-11-14T12:12:34+5:30

वांगी : नेवरी (ता. कडेगांव) येथील येरळा नदी पात्रातून यारीच्या साह्याने वाळू उपसा करताना वांगी येथील हनुमंत पोपट सूर्यवंशी ...

One dies after drowning while extracting sand in Sangli | Sangli: वाळू काढताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

Sangli: वाळू काढताना पाण्यात बुडून एकाचा मृत्यू

वांगी : नेवरी (ता. कडेगांव) येथील येरळा नदी पात्रातून यारीच्या साह्याने वाळू उपसा करताना वांगी येथील हनुमंत पोपट सूर्यवंशी (वय ४०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कडेगाव पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

हणंमत सुर्यवशी हे मिळेल तो रोजगार करुन कुटुंब चालत होते. नेवरी येथील बाळू चव्हाण हे येरळा नदीपत्रातील वाळू काढून त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करतात. नदीत वाळू काढण्यासाठी यारी बसवली आहे. ती चालवण्याचे काम मच्छिंद्र मोहिते व मयत हनुमंत सूर्यवंशी करायचे. 

सोमवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास दोघे यारीला रस्सी बांधण्याचे काम करत होते. त्यावेळी हनुमंत सुर्यवशी हे नदीपत्रात पाण्यात बुडाले. त्याला मच्छिंद्र व बाळू चव्हाण यांनी पाण्याबाहेर काढून कडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. असता डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेची तक्रार आनंदराव भानदास सूर्यवंशी यांनी कडेगाव पोलिसात दिलीअसून कडेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हनुमंत यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. सर्व कुटुंबाची जबाबदारी हनुमंत यांच्यावर होती. त्यांच्या मृत्यूमुळे त्याचे कुटुंबांवर आभाळ कोसळले.

Web Title: One dies after drowning while extracting sand in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.