Sangli: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 12:16 IST2023-11-13T12:15:21+5:302023-11-13T12:16:03+5:30
जत : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. भीमराव दादू चौगुले (वय ५५, रा. बागेवाडी) असे मृताचे ...

Sangli: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एकजण ठार
जत : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. भीमराव दादू चौगुले (वय ५५, रा. बागेवाडी) असे मृताचे नाव आहे. विजापूर- गुहागर महामार्गावर जत तालुक्यातील बिरनाळ फाट्याजवळ काल, रविवारी हा अपघात झाला. ही घटना आज, सोमवारी पहाटे उघडकीस आली.
भीमराव हे रविवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ओलांडून घराकडे जात होते. बिरनाळ हायस्कूलजवळ अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत ते घटनास्थळी पडून होते. त्यांना मदत न मिळाल्याने जागीच मृत्यू झाला. सकाळी ही घटना उघडकीस आली. मयत भीमराव हे जत पोलीस ठाण्याचे हवालदार शामराव चौगुले व जत हायस्कूलचे शिक्षक शिवाजी चौगुले यांचे बंधू होत.