वसगडे येथे टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:29 AM2020-12-06T04:29:02+5:302020-12-06T04:29:02+5:30
भिलवडी : सांगलीहून भिलवडी स्टेशनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने धडक दिल्याने वसगडे (ता. पलूस) येथे पदाचाऱ्याचा मृत्यू झाला. उस्मान ...
भिलवडी : सांगलीहून भिलवडी स्टेशनकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने धडक दिल्याने वसगडे (ता. पलूस) येथे पदाचाऱ्याचा मृत्यू झाला. उस्मान कादर फकीर (वय ४८) असे मृताचे नाव आहे. ही घटना शनिवारी सकाळी ७:३० वाजता वसगडे येथील येरळा नदीवरील पुलावर घडली.
उस्मान फकीर येरळा नदीवरील पुलावरून घराकडे पायी चालत येत होते. यावेळी संगलीकडून भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने (क्र. एमएच १०, झेड. १८८०) पाठीमागून त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी सांगली येथे नेत असतानाच त्यांना वाटेत मृत्यू झाला.
अपघातानंतर चालक न थांबता टँकरसह पसार झाला. नागरिकांनी पाठलाग करून त्यास वसगडे येथील रेल्वे गेटजवळ पकडले व भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले. चालक राजू मेहबूब पठाण (रा. इनामदार प्लॉट, जामवाडी) यास पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीसपाटील शशिकांत शिंदे यांनी घटनेबाबत भिलवडी पोलिसांत वर्दी दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप, चंद्रकांत कोळी करीत आहेत.
चौकट -
तेराव्या वर्षी अपघातातून बचावले
१९८५ मध्ये तासगाव येथे झालेल्या ट्रक अपघातात उस्मान फकीर यांनी उजवा हात गमावला होता. एका हाताने ते घरांची रंगरंगोटी, तसेच सफाईची कामे करून उदरनिर्वाह करायचे. त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने वसगडे येथील विकास सोसायटीत त्यांना शिपाई पदावर सेवेत घेतले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
फोटो -०५उस्मान फकीर