सांगलीत दागिन्यांचे बिल न देता एकास लाखाला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:26 AM2021-03-18T04:26:36+5:302021-03-18T04:26:36+5:30
सांगली : शहरातील विजयनगर परिसरात ज्वेलर्स दुकानातून दागिने खरेदी करुन त्याची रक्कम ट्रान्सफर केल्याचा बहाणा करुन एकास गंडा घालण्यात ...
सांगली : शहरातील विजयनगर परिसरात ज्वेलर्स दुकानातून दागिने खरेदी करुन त्याची रक्कम ट्रान्सफर केल्याचा बहाणा करुन एकास गंडा घालण्यात आला. याप्रकरणी ऋषिकेश श्रीनिवास दळवी (वय ३५, रा. विजयनगर,सांगली) यांनी रणधीर राजेंद्र भोसले (वय ३०, रा. खानविलकर वाडा, बंकेश्वर मंदिराजवळ, जत) याच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी दळवी यांचे विजयनगर परिसरात ओंकार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. दि. ७ डिसेंबर रोजी संशयित भोसले हा दुकानात आला. त्याने दुकानातून एक लाख ३ हजार रूपये किमतीचे एक जेंटस् व दोन लेडीज अंगठ्या आणि दोन जोड टॉप्स असे एकूण १९ ग्रॅम ६० मिली वजनाचे दागिने खरेदी करत ही रक्कम एनईएफटी केल्याचे दळवी यांना सांगितले. मात्र, त्याबाबतची रक्कम दळवी यांच्या खात्यावर जमा झाली नाही. त्यानंतर भोसले याने दळवी यांना धनादेश दिला. मात्र, तो वटला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दळवी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर भोसले यास अटक करण्यात आली आहे.