वीज अभियंत्यांकडून मुख्यमंत्री निधीसाठी एक लाख रुपयांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:56+5:302021-07-31T04:26:56+5:30
सांगलीत सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री निधीसाठीचा धनादेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, ...
सांगलीत सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री निधीसाठीचा धनादेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे देण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, पृथ्वीराज शिंदे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वीज अभियंत्यांची संघटना असलेल्या सबऑर्डीनेट इंजिनीअर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री निधीला एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघटनेचे पदाधिकारी पृथ्वीराज शिंदे, राजाराम माने, सचिन सदामते, गणेश कांबळे, आशिष मेहता, प्रकाश पाटील यांनी मदतीचा धनादेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे सांगलीत सुपुर्द केला. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आमदार विक्रमसिंह सावंत, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जितेश कदम आदी उपस्थित होते. डॉ. राऊत यांनी मदतीचे कौतुक केले. ते म्हणाले की, कोविड आणि महापूर काळात वीज कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची कसोटी लागली, त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. शिवाय मुख्यमंत्री निधीला मदत देऊन त्यांनी सामाजिक बांधीलकीही जपली आहे.