मिरज-बेळगाव विशेष रेल्वेस एक महिना मुदतवाढ, प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:43 PM2024-08-30T13:43:30+5:302024-08-30T13:45:51+5:30
गाडी कायमस्वरूपी करण्याची मागणी
मिरज : मिरज-बेळगाव-मिरज या विशेष रेल्वेच्या फेरीस एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.
बेळगाव-मिरज या गाडीस विशेष दर्जा देण्यात आल्याने सुपरफास्टचे तिकीट दर आकारण्यात येत आहेत. मात्र, तरीही या गाडीस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. व्यापारी, कामगार, विद्यार्थी व मिरज शहरात वैद्यकीय उपचारासाठी घेणाऱ्या रुग्णांना ही गाडी सोयीची आहे. प्रवाशांचा प्रतिसाद असल्याने यापूर्वी या गाडीस चार वेळा मुदतवाढ मिळाली आहे.
ही गाडी कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी सेनेचे संदीप शिंदे व मध्य रेल्वे पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य किशोर भोरावत यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.