Sangli: किरकोळ कारणातून रामापूरच्या एकाचा शिरगाव फाट्यावर खून, संशयित पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 05:43 PM2023-08-22T17:43:12+5:302023-08-22T17:43:56+5:30

वांगी : शिरगांव फाटा (ता.कडेगाव) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर, किरकोळ कारणातून सुरेश राजाराम पाटील (वय ५४ रा.रामापूर, ता.कडेगाव) यांना लाथा-बुक्क्यांनी ...

One of Ramapur was killed at Shirgaon Phata due to minor reasons in Sangli | Sangli: किरकोळ कारणातून रामापूरच्या एकाचा शिरगाव फाट्यावर खून, संशयित पसार

Sangli: किरकोळ कारणातून रामापूरच्या एकाचा शिरगाव फाट्यावर खून, संशयित पसार

googlenewsNext

वांगी : शिरगांव फाटा (ता.कडेगाव) येथे हॉटेलमध्ये बसल्यानंतर, किरकोळ कारणातून सुरेश राजाराम पाटील (वय ५४ रा.रामापूर, ता.कडेगाव) यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून, जमिनीवर डोके आपटण्यात आले. गंभीर जखमी सुरेश पाटील यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी संशयित रोहित आनंद माळी (वय ३०, रा.रामापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तो पसार झाला आहे.

याबाबत चिंचणी-वांगी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वांगीपासून दक्षिणेला ३ किमी अंतरावर जुना सांगली- सातारा रस्त्यावर असणाऱ्या शिरगाव फाटा (ता.कडेगाव) येथे शनिवार, दि. १९ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हॉटेल स्वामी समर्थमध्ये सुरेश पाटील बसले होते. त्यावेळी संशयित रोहित माळी हा येऊन बसला. तेव्हा पाटील आणि रोहित माळी यांच्यात शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रोहित याने पाटील यांना लाथा-बुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर, पाटील यांना हॉटेलबाहेर काढून रस्त्यावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, त्यांचे डोके जमिनीवर आपटून गंभीर जखमी केली. 

मारहाणीनंतर रोहितने पलायन केले. जखमी सुरेश पाटील यांना कराड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. सोमवार, दि. २१ रोजी सुरेश पाटील यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मृत सुरेश पाटील यांचे भाऊ महादेव राजाराम पाटील यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रोहित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तो पसार झाला असून, त्याचा शोध सुरू आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पद्मा कदम यांनी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: One of Ramapur was killed at Shirgaon Phata due to minor reasons in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.