सांगली: आटपाडी नजीक अपघातात इटकी येथील एकजण जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:59 AM2022-10-26T11:59:08+5:302022-10-26T11:59:33+5:30

कोल्हापूरकडे ट्रॅक्टरसाठी ट्रॉली आणण्यासाठी निघाले होते.

One person from Itki died on the spot in an accident near Atpadi | सांगली: आटपाडी नजीक अपघातात इटकी येथील एकजण जागीच ठार

सांगली: आटपाडी नजीक अपघातात इटकी येथील एकजण जागीच ठार

googlenewsNext

लक्ष्मण सरगर

आटपाडी: आटपाडीनजीक शेरेवाडी पाटीजवळ ट्रॅक्टरला पाठीमागून आयशरने दिलेल्या धडकेत इटकी येथील एकजण जागीच ठार झाला. पोपट श्रीमंत सावंत (वय ५०) असे मृताचे नाव आहे.

घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील इटकी येथील पोपट सावंत हे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास इटकी येथून कोल्हापूरकडे ट्रॅक्टरसाठी ट्रॉली आणण्यासाठी निघाले होते. आटपाडीनजीक शेरेवाडीपाटीजवळ आले असता पाठीमागून येणाऱ्या आयसर टेम्पोने त्याच्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यामध्ये ते जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच इटकी व राजेवाडी येथील त्यांचे नातेवाईक तातडीने आटपाडीला आले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, आटपाडी येथे आणण्यात आला. घटनेची नोंद आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

Web Title: One person from Itki died on the spot in an accident near Atpadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.