संशयिताच्या नातेवाईकांकडून एकास दमदाटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:08 PM2019-06-05T12:08:26+5:302019-06-05T12:11:04+5:30
हरिपूर रस्त्यावरील अपघातानंतर ट्रक क्लिनरच्या खून प्रकरणातील संशयितांच्या नातेवाईकांनी एकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडला. याप्रकरणी बाबासाहेब शबुद्दीन मुल्ला (वय ५०, रा. शंभर फुटी रोड एमएसईबीच्या मागे) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सांगली : हरिपूर रस्त्यावरील अपघातानंतर ट्रक क्लिनरच्या खून प्रकरणातील संशयितांच्या नातेवाईकांनी एकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी रात्री पावणेदहा वाजता घडला. याप्रकरणी बाबासाहेब शबुद्दीन मुल्ला (वय ५०, रा. शंभर फुटी रोड एमएसईबीच्या मागे) यांनी सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
शनिवारी रात्री हरिपूर रस्त्यावरील काळी वाट परिसरात ट्रकने मोटारसायकलला धडक दिली. यात मोटारसायकलवरील ऋचा धेंडे ही चिमुरडी ठार झाली. त्यानंतर जमावाने ट्रकचा क्लिनर कुमार आळगीकर याला बाहेर ओढून बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक केली आहे. त्यात स्वप्नील एरंडोलीकर, सागर हेडगे, आकाश ऊर्फ गोट्या शेखर कांबळे, किरण मगदूम, पृथ्वीराज होवाळे या पाच जणांचा समावेश असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
यातील संशयित किरण मगदूम याचे वडील सुरेश व आई सुरेखा मगदूम यांनी बाबासाहेब मुल्ला यांना ह्य तू पोलिसांचा खबऱ्या आहेस, तूच माझ्या मुलाला आरोपी केले आहेत,ह्ण असे म्हणत शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुरेश व सुरेखा मगदूम या दाम्पत्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.