एक पणती त्यांच्यासाठी...

By admin | Published: November 13, 2015 11:48 PM2015-11-13T23:48:28+5:302015-11-13T23:51:03+5:30

देणगीदारांची मदत : सांगलीतील अनाथाश्रमात दिवाळी उत्साहात

For one of them ... | एक पणती त्यांच्यासाठी...

एक पणती त्यांच्यासाठी...

Next

सुरेंद्र दुपटे- सांगली -दीपावली म्हणजे उत्साह आणि चैतन्याची उधळण. अंधारलेल्या वाटा सोडून प्रकाशवाटेकडे मार्गक्रमण करण्याचा एक प्रयत्न. दिवाळीमध्ये लख्ख दिव्यांनी उजळून गेलेल्या सांगलीतील वेलणकर अनाथ बालकाश्रमात देणगीदारांनी दिलेल्या वर्गणीतून दिवे, पणत्या, नवीन कपडे, फराळ यांचा आनंद घेत येथील मुलींनी उत्साहात दिवाळी साजरी केली.
अनाथ बालकांना देणगीदारांनी दिलेल्या वर्गणीतूनच दिवाळीत नवीन कपडे, फराळ, किल्ल्यावरील साहित्य, दिवे, पणत्या, आकाशकंदील याचा आनंद मिळतो. समाजातील व्यापारी, उद्योजक, देणगीदारांनी वेलणकर बालकाश्रमामध्ये येऊन मुलींना नवीन कपडे, फराळ, खाऊ, फटाके, किल्ल्यावरील साहित्य, आकाशकंदील, रांगोळी दिल्याने मुलींची दिवाळी उत्साहात साजरी झाली.
या संस्थेची स्थापना १९४७ ची आहे. ६८ वर्षे ही संस्था अनाथ मुलींचे संगोपन करीत आहे. या मुलींना संगणक प्रशिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेच्या अधीक्षक अनुराधा डुबल यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, सरकारी अनुदान दिले जाते, परंतु ते अल्प प्रमाणात मिळते. समाजातील देणगीदार आपापल्यापरीने मुलींना मदत करीत असतात. वर्गणी, धान्य, कपड्यांची मदत केली जाते. लोकांनी दीपावलीत खूप मदत केली. फराळाऐवजी कच्चा माल दिला, तर तो टिकेल.
यंदा फराळ जास्त प्रमाणात आला आहे. देणगीदारांच्या मदतीमुळे मुलींची दिवाळी उत्साहात पार पडली. यावेळी रेश्मा पाटील, भारती कदम, आरती तरवळकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.


संस्थेकडून व्यावसायिक प्रशिक्षण
या संस्थेची स्थापना १९४७ ची आहे. ६८ वर्षे ही संस्था अनाथ मुलींचे संगोपन करीत आहे. या मुलींना संगणक प्रशिक्षण, तसेच व्यावसायिक शिक्षण दिले जात असल्याची माहिती संस्थेच्या अधीक्षक अनुराधा डुबल यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, सरकारी अनुदान दिले जाते, परंतु ते अल्प प्रमाणात मिळते. यामुळे सामाजिक मदतीची गरज संस्थेला भासत असते. संस्थेला विविध सामाजिक स्तरातून मदत मिळत असते. याचा चांगला उपयोगही संस्थेला होत आहे.

Web Title: For one of them ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.