किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 01:46 PM2022-11-22T13:46:09+5:302022-11-22T13:46:35+5:30

रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने डोक्यात हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने जागीच मृत्यू झाला.

One was killed in a fight between two truck drivers due to minor reasons, the incident took place in Rajewadi in Sangli | किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना

किरकोळ कारणातून दोघा ट्रकचालकांच्या भांडणात एकाचा खून, सांगलीतील राजेवाडीत घडली घटना

Next

आटपाडी : राजेवाडी (ता. आटपाडी) येथील हिंगणी रस्त्यावर असलेल्या वीटभट्टीवर दगडी कोळशाची राख घेऊन आलेल्या दोन ट्रकचालकांमध्ये किरकोळ वादातून हाणामारी झाली. यावेळी एकाने टॉमी घेऊन डोक्यात हल्ला केल्याने दुसऱ्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. हणमंत लक्ष्मण नागरगोजे (वय ३३, रा. धानोरा, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृताचे, तर गणेश उत्तमराव मुंगल (२९, रा. खैरगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड) असे हल्लेखोराचे नाव आहे. रविवार, दि. २० रोजी रात्री ११ वाजता ही घटना घडली. आटपाडी पोलिसांनी हल्लेखोर गणेश मुंगल याला अटक केली आहे.

राजेवाडी येथील हिंगणी रस्त्यावर चंद्रकांत तुकाराम भोसले यांची वीटभट्टी आहे. या वीटभट्टीसाठी लागणारी दगडी कोळशाची राख घेऊन नांदेड जिल्ह्यातून आलेल्या ट्रकवर (क्र. एमएच २६ बीई ४४७६) चालक म्हणून गणेश मुंगल व हणमंत नागरगोजे हे दोघे आले होते. रविवारी रात्री पावणेअकरा वाजण्याच्यासुमारास दोघांमध्ये भांडण सुरू झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी चालक गणेश मुंगल याने रागाच्या भरात ट्रकमध्ये असलेल्या लोखंडी टॉमीने हणमंत नागरगोजे याच्या डोक्यात हल्ला केला. वर्मी घाव बसल्याने हणमंतचा जागीच मृत्यू झाला.

याबाबत वीटभट्टीचालक चंद्रकांत तुकाराम भोसले यांनी आटपाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश मुंगले याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करत आहेत.

Web Title: One was killed in a fight between two truck drivers due to minor reasons, the incident took place in Rajewadi in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.