कांद्याची आवक वाढली, दर घसरले-: थंडीमुळे कांद्याला किलोमागे १ ते ८ रुपये भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:24 AM2019-02-08T00:24:40+5:302019-02-08T00:25:19+5:30
कांद्याचे वाढलेले उत्पादन, शेतकऱ्यांना मिळत असलेला चांगला उतारा या प्रमाणात मागणी नसल्याने दरातील घसरण कायम आहे. थंडीचा जोर वाढल्याने कांद्याची प्रत बिघडली आहे. या आठवड्यात सरासरी ५ हजार ते ७ हजार क्विंटल कांद्याची
सांगली : कांद्याचे वाढलेले उत्पादन, शेतकऱ्यांना मिळत असलेला चांगला उतारा या प्रमाणात मागणी नसल्याने दरातील घसरण कायम आहे. थंडीचा जोर वाढल्याने कांद्याची प्रत बिघडली आहे. या आठवड्यात सरासरी ५ हजार ते ७ हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून, १०० ते ८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. या हंगामातील कांद्याला कोंब फुटत असल्याने मागणीवर परिणाम झाला आहे.
सांगलीतील विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कांद्याची संपूर्ण राज्यातून आवक वाढली आहे. विशेषत: नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यासह इतर भागातूनही कांदा येत आहे. त्याप्रमाणात बाजारपेठेतून मागणी नसल्याचे चित्र आहे. देशभरातील संपूर्ण राज्यातच उत्पादन वाढल्याने मागणी नाही. पूर्वी शेजारच्या कर्नाटक, मध्यप्रदेशसह इतर राज्यातून मागणी होती. आता प्रत्येक राज्यातच उत्पादन चांगले होत असल्याने त्या भागातून मागणी होत नसल्याचे दिसत आहे.
कमी दर मिळत असल्याने शेतकºयांनाही नुकसान सोसावे लागत आहे. यावर उपाय म्हणून शासनाने शेतकºयांना २०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यामुळेही फारसा दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. अजूनही चांगला दर मिळाला तरच शेतकºयांचा तोटा भरून निघणार आहे. त्यातच थंडीमुळे कांद्याला कोंब येण्याचे प्रमाण वाढत आहे. मार्च महिन्यात येणारा कांदा टिकावू असल्याने घाऊक बाजारातील मागणीवरही मर्यादा आल्या आहेत.
शेतकºयांना चांगले उत्पन्न मिळाल्याने सरासरीपेक्षा चांगली आवक होत आहे. सध्या विक्रीसाठी येणाºया कांदा उगविण्याचे प्रमाण अधिक असल्याने घाऊक बाजारातील मागणीवर परिणाम होत आहे.
- राजेश पोपटाणी, अध्यक्ष, सुभाष निलाखे कांदा, बटाटा असोसिएशन