राजारामबापू बॅँकेची २२ मार्च रोजी ऑनलाइन वार्षिक सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:15+5:302021-03-04T04:48:15+5:30
इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५० पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राजारामबापू सहकारी शेड्युल्ड ...
इस्लामपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ५० पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे राजारामबापू सहकारी शेड्युल्ड बॅँकेची ४० वी वार्षिक साधारण सभा सोमवार, दि. २२ मार्च रोजी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली.
प्रा. पाटील म्हणाले, नागरी सहकारी बॅँकांच्या वार्षिक सभा ऑनलाइन घेण्यासंदर्भात सहकार विभागाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. २२ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता इस्लामपूरमधील मार्केट यार्ड शाखेतून ही ऑनलाइन सभा होईल. सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभासदांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर स्वतंत्र लिंक पाठविण्यात येणार आहे.
सभासदांनी बॅँकेच्या नजीकच्या शाखेत ई-मेल, व्हॉटस्अॅप सुविधा असलेल्या मोबाइल क्रमांकाची ५ मार्चपूर्वी नोंद करावी, असे आवाहन कार्यकारी संचालक आर. एस. जाखले यांनी केले आहे.