सांगली जिल्हा मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने वर्धापन दिनानिमित्त ऑनलाइन मराठी स्वाक्षरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:26 AM2021-03-10T04:26:51+5:302021-03-10T04:26:51+5:30
मनसेच्यावतीने सचिन चौगले यांचा प्रमाणपत्र देऊन कामेरी गावकामगार तलाठी रामेश्वर शिंदे यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी कोतवाल आनंदा ठोंबरे, ...
मनसेच्यावतीने सचिन चौगले यांचा प्रमाणपत्र देऊन कामेरी गावकामगार तलाठी रामेश्वर शिंदे यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी कोतवाल आनंदा ठोंबरे, मनसे तालुका उपाध्यक्ष अरविंद कदम, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भाळवणे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथे सांगली जिल्हा मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन, कविवर्य कुसुमाग्रज जयंती आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी स्पर्धा घेण्यात आल्या. या ऑनलाइन स्पर्धेत ४८ स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी स्पर्धकांमधून सचिन चौगले यांच्यासह उत्कृष्ट नऊ स्पर्धकांना मनसेच्यावतीने प्रमाणपत्र देऊन कामेरी गावकामगार तलाठी रामेश्वर शिंदे, कोतवाल आनंदा ठोंबरे यांच्याहस्ते गौरविण्यात आले. यावेळी मनसे तालुका उपाध्यक्ष अरविंद कदम, ईश्वरपूर शहर सचिव श्रीमंत जाधव, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित भाळवणे, आशिष कदम, निखिल कापसे, सौरभ भाळवणे, शिवतेज भाळवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.