‘लोकमत’तर्फे ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:26 AM2021-09-25T04:26:30+5:302021-09-25T04:26:30+5:30

सांगली : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे २ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खुली ...

Online open chess tournament by Lokmat | ‘लोकमत’तर्फे ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा

‘लोकमत’तर्फे ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धा

Next

सांगली : ‘लोकमत बालविकास मंच’तर्फे २ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत खुली बक्षिसे, फिडे मानांकित खेळाडू, वयोगटानुसार (८,१२,१६ अंतर्गत), महिला, ज्येष्ठ तसेच सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्हानिहाय बक्षिसे देण्यात येणार आहेत.

स्पर्धेत विविध मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्याशी ऑनलाईन खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धा सर्व वयोगटातील सर्वांसाठी खुली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पूर्व नावनोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणी ३० सप्टेंबरपर्यंत करता येईल.

स्पर्धेसंदर्भातील सर्व अधिकार आयोजकांकडे राखीव असतील. या स्पर्धेसाठी इव्हेंट पार्टनर म्हणून सक्सेस अबॅकस अँड एज्युकेशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सांगली ब्रँच हे असून, स्पर्धेचे सर्व तांत्रिक नियोजन केपी चेस अकॅडमी, सांगली हे करणार आहेत.

चाैकट

इव्हेंट पार्टनर सक्सेस अबॅकस, सांगली

अबॅकस कोर्समुळे मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढण्यास मदत होते, विद्यार्थी २ ते ९९ पर्यंतचे पाढे पाठांतर न करता म्हणू शकतात. स्कॉलरशिप, सैनिक स्कूल व नवोदय यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतो. सक्सेस अबॅकसअंतर्गत कोर्सची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण कोर्स चार लेवलमध्ये असल्यामुळे वेळेची व पैशाची बचत होते. तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग आणि अबॅकससोबत वेदिक गणिताच्या टेक्निक मोफत शिकवल्या जातात. तरी विद्यार्थ्यांनी याचा सक्सेस अबॅकस, ९४२२६०३०७७ वर संपर्क साधून लाभ घ्यावा.

चाैकट

स्पर्धेची तारीख : २ ऑक्टोंबर २०२१

स्पर्धेची वेळ : सायंकाळी ०७ ते ०८

स्पर्धेचे स्थळ : Lichess.org

स्पर्धेची नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क ७५८८८४२६०५, ८३९००१८३०८

Web Title: Online open chess tournament by Lokmat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.