समाजशील शिक्षकच यशस्वी होऊ शकेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:02+5:302020-12-29T04:26:02+5:30
वारणावती : शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, पालक व गाईड असला पाहिजे तरच तो शिक्षक यशस्वी होतो. प्रत्येक शिक्षक ...
वारणावती : शिक्षक हा विद्यार्थ्यांचा मित्र, पालक व गाईड असला पाहिजे तरच तो शिक्षक यशस्वी होतो. प्रत्येक शिक्षक हा समाजशील असला पाहिजे, असे मत शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब नायकवडी यांनी व्यक्त केले.
सोनवडे (ता. शिराळा) येथील हुतात्मा नानकसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरळा व वारणावती केंद्र शाळेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपकार्यकारी अभियंता मिलिंद धर्माधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेब नायकवडी यांची उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल वारणावती व आरळा केंद्रांकडून त्यांचा केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, मोहन पवार, बी. आर. मोहिते, मिलिंद धर्माधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रमण खबाले, आर. सी. पाटील, मारुती साळवी, जितेंद्र लोकरे यांचाही सत्कार करण्यात आला. सी. एम. पाटील, मिलिंद धर्माधिकारी, रमण खबाले यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. अरविंद देसाई, जितेंद्र लोकरे यांनी सूत्रसंचालन केले तर मोहन पवार यांनी आभार मानले.
फोटो- २८ वारणावती १
फोटो - शिराळा पंचायत समितीच्या उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल बाळासाहेब नायकवडी यांचा मोहन पवार, बी. आर. मोहिते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.