महापुरुषांचे विचारच विभागलेल्या बहुजनांना जोडू शकतात : बलभीम माथेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:49 AM2021-02-28T04:49:25+5:302021-02-28T04:49:25+5:30
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बलभीम माथेले यांनी व्यक्त केले. आटपाडी येथे बामसेफचे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी माथेले ...
प्रदेश कार्यकारी अध्यक्ष बलभीम माथेले यांनी व्यक्त केले.
आटपाडी येथे बामसेफचे तालुकास्तरीय प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी
माथेले म्हणाले, प्राचीन मध्ययुगीन व आधुनिक भारताच्या इतिहासात बहुजन समाजातील महामानवांनी माेठा लढा दिला. या महामानवांनी आम्हा सर्वांच्या हक्क अधिकारांसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधूता स्थापित व्हावी यासाठी अत्युच्च पातळीवर विवेचन केले. आज बहुजन समाजातील लोकांनी परस्पर संपर्क, संवादाच्या माध्यमातून विचारधारेच्या आधारे शक्तीचे संचय करून व्यवस्था परिवर्तनासाठी वैचारिक बैठक स्थापित करून सातत्याने काम करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवराय, राष्ट्रमाता जिजाऊ, राजे मल्हारराव होळकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राजे यशवंतराव होळकर यांचे जीवन चरित्र तरुणांनी वाचले पाहिजे.
वामनदादा कर्डक यांच्या ‘तुफानातील दिवे’ या गीताने शिबिराचा समारोप झाला. यावेळी बामसेफचे जिल्हाध्यक्ष बळवंत सागर यांचे भाषण झाले.
यावेळी बहुजन मुक्ती मोर्चाचे सांगली जिल्हाध्यक्ष रवी सोलनकर (जत), आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते अरुण वाघमारे, साहेबराव चंदनशिवे, रणजित ऐवळे, अंकुश मुढे, शैलेश ऐवळे, दयानंद भोरे, नंदकुमार लोहार, दत्ता कांबळे, आकाश कांबळे, सागर बुधावले, गणेश हेगडे, हरिदास हेगडे, सोनाली पाटील, सत्यवान दुधाळ, रणजित ऐवळे, रवींद्र लांडगे, सागर भोसले आदी उपस्थित होते.