CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:05 PM2020-04-03T17:05:57+5:302020-04-03T17:08:59+5:30
लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
सांगली : लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
वाहतूक बंद आणि कामगार उपलब्ध नसणे ही तुटवड्याची मुख्य कारणे आहेत. सांगलीच्या बाजारपेठेत २३ मार्चला शेवटची मालवाहतुकीची वाहने आली, त्यानंतर एकही वाहन आले नाही. जिल्ह्यात गव्हाचा ९० टक्के पुरवठा मध्य प्रदेशातून होतो. ७५ टक्क्यांहून अधिक तांदूळ कर्नाटकातून येतो.
आठवडाभरापासून एकही वाहन आलेले नाही. तेलाचे कारखाने कामगारांअभावी बंद आहेत. पुणे, वाशी, लातूर या डाळींच्या प्रमुख बाजारपेठांतही डाळींचा व्यापार थंडावला आहे. सांगलीत साखर, गुळाचा साठा दोन महिने पुरेल इतकाच आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले क ी, तांदूळ वगळता फक्त दहा ते वीस टक्केच धान्य शिल्लक आहे. सूर्यफूल तेल परराज्यांतून येते, त्याचीही आवक थांबली आहे.