शिराळा, वाळवा, मिरजेचे सभापतिपद खुल्या गटासाठी
By admin | Published: July 18, 2014 11:30 PM2014-07-18T23:30:58+5:302014-07-18T23:31:32+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत
सांगली : जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांचे सभापतिपद आज, शुक्रवार जिल्हाधिकारी कार्यालयात सोडत पध्दतीने निश्चित करण्यात आले. यामध्ये शिराळा, वाळवा व मिरज पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले. कवठेमहांकाळ, कडेगाव, विटा, आटपाडी व तासगाव पंचायत समितीचे सभापतिपद महिलांसाठी आरक्षित झाले आहे. हे आरक्षण अडीच वर्षासाठी असेल.
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी सोडत काढण्यात आली. महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी सोडत प्रक्रियेच्या नियमांचे वाचन केले. यानंतर सोडतीला प्रारंभ करण्यात आला. दहा पंचायत समिती सभापतीपदांपैकी अनुसूचित जाती एक, ओबीसी एक, ओबीसी महिला दोन, सर्वसाधारण महिला राखीव तीन, सर्वसाधारण प्रवर्ग (खुला) तीन याप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आले. या आरक्षित केलेल्या पंचायत समितीच्या सभापतींची पदे फिरत्या क्रमाने निश्चित आली आहेत. (प्रतिनिधी)
शिराळा : सर्वसाधारण (खुला)
वाळवा : सर्वसाधारण (खुला)
मिरज : सर्वसाधारण (खुला)
कवठेमहांकाळ : सर्वसाधारण (महिला)
पलूस : अनुसूचित जाती
कडेगाव : सर्वसाधारण (महिला)
खानापूर : ओबीसी (महिला)
आटपाडी : ओबीसी (महिला)
जत : ओबीसी
तासगाव : सर्वसाधारण (महिला)