कुची येथील सार्वजनिक रस्ता खुला करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:28+5:302021-09-09T04:32:28+5:30
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहंकाळ) येथील गावठाणमधून जाणारा कारखाना गट कार्यालय ते पाण्याची टाकी दरम्यानचा रस्ता काही जणांनी तारेचे ...
कवठेमहांकाळ : कुची (ता. कवठेमहंकाळ) येथील गावठाणमधून जाणारा कारखाना गट कार्यालय ते पाण्याची टाकी दरम्यानचा रस्ता काही जणांनी तारेचे कुंपण टाकून बंद केला आहे. तो तत्काळ खुला करावा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा तालुकाप्रमुख हणमंतराव शिंदे व उपप्रमुख सुहास जाधव यांनी दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता कायम रहदारीचा असून, काही जणांनी तारेचे कुंपण करून अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना अडचणीचे ठरत आहे. याबाबत ग्रामपंचायतीला वेळोवेळी लेखी व तोंडी कळवूनही याची गंभीरपणे दखल घेतलेली नाही. ग्रामपंचायतीने तत्काळ अतिक्रमण न हटविल्यास आंदोलन करावे लागेल.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे, जिल्हा विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष वैभव कुलकर्णी, तालुका उपप्रमुख सुहास जाधव, अधिकराव पोळ, स्वप्निल गुरव, मनोज चव्हाण, महेश साबळे उपस्थित होते.