वडर काॅलनीत खुलेआम दारू विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:26 AM2021-04-16T04:26:42+5:302021-04-16T04:26:42+5:30
सांगली : राज्यात संचारबंदी असताना शहरातील वडर कॉलनी येथे दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. तेथे मद्यपींची मोठी गर्दी होत ...
सांगली : राज्यात संचारबंदी असताना शहरातील वडर कॉलनी येथे दारूची खुलेआम विक्री सुरू आहे. तेथे मद्यपींची मोठी गर्दी होत आहे. दारू विक्री पूर्णपणे बंद करावी, अन्यथा सर्व दुकाने खुली करावीत, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा अमर निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.
निंबाळकर म्हणाल्या, सांगली शहरातील प्रभाग क्रमांक दहामधील वडर कॉलनी, स्वरूप टॉकीज परिसर, रेल्वेस्टेशन परिसर येथे खुलेआम दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींची मोठी गर्दी होत आहे. मद्यपींचा त्रास प्रभागातील महिलांना व येथील राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. शहरातील सर्व मद्यपींची गर्दी या परिसरात होत असल्याने कोरोनाचा संसर्ग प्रभाग दहामध्ये वाढण्याची शक्यता आहे. शिवाय लॉकडाऊनचा फायदा उठवत दारूची दुप्पट-तिप्पट किमतीस विक्री केली जात आहे. याबाबतची माहिती संबंधित विभागांना दिली होती. मात्र, त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई केली नाही. त्यामुळे राज्य शासनाने एकतर दारूची दुकाने पूर्णपणे बंद करावीत, अन्यथा सर्व दुकाने खुलेआम सुरू करण्यास परवानगी द्यावी.