शहरातील पाॅझिटिव्हिटी दर कमी झाल्याने दुकाने उघडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:19 AM2021-07-10T04:19:20+5:302021-07-10T04:19:20+5:30
सांगली : जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने व्यापार, व्यवसाय सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ...
सांगली : जिल्ह्यासह महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याने व्यापार, व्यवसाय सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी डाॅ. अभिजीत पाटील यांना निवेदन दिले.
राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, शेखर माने यांच्या नेतृत्त्वाखाली व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हा व महापालिका क्षेत्रातील व्यापार गेले तीन महिने बंद आहे. त्यामुळे व्यापारीवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. जिल्हा व महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हिटी ७.१९ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने व्यापार सुरू करावा, अशी मागणी केली. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांना कोरोना रुग्ण आकडेवारी अहवाल देण्यात येणार असून, त्यांच्या आदेशाने येत्या सोमवारपासून व्यवसाय सुरू करण्याचा सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी विराज कोकणे, चेंबर ऑफ कॉमर्सचे शरद शहा, रेडिमेड कापड दुकान असोसिएशनचे अध्यक्ष शामजी पारेख, नरेंद्र चेडा, किराणा असोसिएशनचे अरुण दांडेकर उपस्थित होते.