जयंतरावांविरोधात विरोधक एकवटले

By admin | Published: July 16, 2015 12:10 AM2015-07-16T00:10:50+5:302015-07-16T00:10:50+5:30

सर्वपक्षीय आव्हान : इस्लामपूर कृषी बाजार समितीची निवडणूक रंगणार

Opponent concentrated against Jayantra | जयंतरावांविरोधात विरोधक एकवटले

जयंतरावांविरोधात विरोधक एकवटले

Next

अशोक पाटील- इस्लामपूर शहरासह कृषी उत्पन्न बाजार समितीवर वर्चस्व असलेल्या माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्यासाठी सर्वपक्षीय विरोधक एकवटले आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढणार आहे.इस्लामपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांचे वर्चस्व आहे. सहकारी क्षेत्रातील सर्वच निवडणुका बिनविरोध होत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीपुढे सर्वपक्षीय नेत्यांनी आव्हान उभे केले आहे. यासाठी सर्व मतभेद बाजूला सारुन विरोधक एकवटले आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीवर जाण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये मोठी रस्सीखेच होती. काहींना तिकीट न मिळाल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त होत आहे, तर विरोधी गटाने शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शेतकरी पॅनेलला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.शेतकरी पॅनेलची स्थापना करण्यामध्ये काँग्रेसचे सी. बी. पाटील, नानासाहेब महाडिक, वैभव नायकवडी, अभिजित पाटील, वैभव पवार, शिवसेनेचे आनंदराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासह शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांचा समावेश आहे. त्यांचे समर्थक राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरोधात निवडणुकीत लढणार आहेत.
गत निवडणुकीप्रमाणेच यावेळची निवडणूक बिनविरोध होणार, अशीच हवा पहिल्या टप्प्यात होती. परंतु राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने आमदार जयंत पाटील यांनीही बिनविरोधसाठी हालचाल केली नाही. तसेच विरोधकांकडूही बिनविरोधचा प्रस्ताव आला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीविरोधात नेमका कोणता पक्ष आव्हान देणार, असा प्रश्न होता.
अखेरच्या टप्प्यात सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येत शेतकरी पॅनेलच्या माध्यमातून एकास एक उमेदवार देण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

आमदार जयंत पाटील यांच्या गटाला हादरा देण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय नेते एकत्र आलो आहोत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे अनेकजण नाराज आहेत, तेही आमच्यासोबत येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीला चांगले आव्हान देणार आहोत.
- सी. बी. पाटील,
संचालक, जिल्हा बॅँक

Web Title: Opponent concentrated against Jayantra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.