विरोधक म्हणजे लुटारुंची टोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:59+5:302021-07-26T04:24:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क संख : संघटनेला निश्चित अशी विचारधारा, ध्येयधोरणे, कार्यप्रणाली असते. परंतु, विरोधकांच्या गटापुढे कोणताही विधायक अजेंडा नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : संघटनेला निश्चित अशी विचारधारा, ध्येयधोरणे, कार्यप्रणाली असते. परंतु, विरोधकांच्या गटापुढे कोणताही विधायक अजेंडा नाही. ती लुटारुंंची टोळी आहे. त्यांच्या कारनाम्यांमुळे जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्याची भूमिका शिक्षक समितीने स्वीकारली आहे, असे मत शिक्षक समितीचे राज्यनेते विश्वनाथ मिरजकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीत तालुका शिक्षक संघ थोरात गटाचे माजी तालुकाध्यक्ष प्रमोद कोडग व उद्धव शिंदे, राहुल टकलेंसह ३२ शिक्षकांनी प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते.
मिरजकर म्हणाले, शिक्षक समितीने आपल्या सत्ताकाळात मयत सभासदांसाठी कर्जमाफी योजना, सभासदांना दोनदा कायम ठेव परत केली आहे. वेळोवेळी कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. निष्कर्जी व लागू असलेल्या सभासदांसाठी नवी पेन्शन योजना आणली आहे. कोरोना संकटकाळात कोविड हॉस्पिटलची उभारणी करून रुग्णांना दिलासा दिला आहे.
यावेळी बाबासाहेब लाड, राजेंद्र नवले, सयाजीराव पाटील, किसन पाटील, शशिकांत भागवत, बाबासाहेब लाड, दयानंद मोरे, अमोगसिद्ध कोळी, यु. टी. जाधव, राजाराम सावंत, बाळासाहेब आडके, एम. बी. चव्हाण उपस्थित होते. एम. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. रामराव मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.