शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:18 AM2019-02-25T00:18:22+5:302019-02-25T00:18:32+5:30

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा ...

Opponents rumors about farmers' funds | शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

शेतकऱ्यांच्या निधीबद्दल विरोधकांकडून अफवा

googlenewsNext

सांगली : शेतकºयांसाठी विविध योजनेअंतर्गत ७५ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. तरीही आमचे सरकार हा निधी पुन्हा काढून घेईल, अशी अफवा विरोधक पसरवित आहेत. शेतकºयांनी अशा अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सहकारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी रविवारी येथे केले.
रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री देशमुख यांच्याहस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, आयुक्त रवींद्र खेबूडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री देशमुख म्हणाले, देशातील १२ कोटी शेतकºयांना योजनेचा फायदा मिळणार आहे. या योजनेचा दोन हजार रूपयांप्रमाणे पहिला हप्ता जिल्ह्यातील २ लाख २७ हजार शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. अल्पभूधारक शेतकºयांना या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षाला ६ हजार रूपयांची मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने १ फेब्रुवारीला योजना जाहीर केली व महिना होण्याअगोदरच २४ फेब्रुवारीला शेतकºयांच्या खात्यात पैसे पाठविण्यात आले, ही इतिहासातील पहिलीच घटना आहे. शेती आणि शेतकरी या दोघांनाही समृध्द करण्यासाठी शासन कटिबध्द आहे.
कृषी यांत्रिकीकरण मोहिमेंतर्गत शेतकºयांना सहा ट्रॅक्टर, एक रोटाव्हेटर व एका हळद कुकरचे पालकमंत्र्यांच्यहस्ते वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित शेतकºयांचा प्रशासनाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विजय देशमुख, उपजिल्हाधिकारी विजया यादव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, कृषी उपसंचालक मकरंद कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कर्जमुक्त होणार
पालकमंत्री देशमुख म्हणाले, शासनाच्या धोरणामुळे मंजूर झालेला रुपया न् रुपया शेतकºयांच्या हातात मिळत आहे. ही तर सुरूवात आहे. यापेक्षा अधिक सुविधा शेतकºयांसाठी पुरविण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या सन्मान योजनेमुळे खासगी सावकारांकडे पैशासाठी जाण्याची गरज नसून बॅँकांमध्येही जावे लागणार नाही. शेतकºयांना कर्जमुक्त करण्याचेच धोरण सरकारने अवलंबिले आहे. ते आता सत्यात उतरत आहे.

Web Title: Opponents rumors about farmers' funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.