मिरज सिव्हिलमधील बदल्यांना विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:28 AM2021-05-20T04:28:05+5:302021-05-20T04:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मिरज मेडिकल कॉलेजमधील तीस डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या सातारा मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिनियुक्तीवर झालेल्या बदल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज मेडिकल कॉलेजमधील तीस डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या सातारा मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिनियुक्तीवर झालेल्या बदल्या रद्द कराव्यात, अशी मागणी राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांमधून होत आहे.
याप्रश्नी भाजप नेत्या नीता केळकर म्हणाल्या की, मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कार्यरत असलेल्या ३१ डॉक्टरांच्या साताऱ्याला केलेला बदल्या तातडीने रद्द कराव्यात, अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल.
रुग्ण सहाय्य समितीचे सतीश साखळकर यांनी याप्रश्नी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, मिरज मेडिकल कॉलेजमधील तीस डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्या सातारा मेडिकल कॉलेजमध्ये प्रतिनियुक्तीवर बदल्या झालेल्या आहेत. या बदल्यांमुळे मिरज मेडिकल कॉलेज व मिरज सिव्हिल हॉस्पिटल कोविड केंद्रात काही डॉक्टर व इतर कर्मचारी यांची कमतरता भासणार नाही, याची खबरदारी घ्यावी. याप्रश्नी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. कोणत्याही अशा निर्णयाचा फटका कोविडप्रश्नी सुरू असलेल्या व्यवस्थापनास बसणार नाही, याचीही काळजी घ्यावी.
सतीश साखळकर
कोरोना रुग्ण साह्य व समन्वय समिती, सांगली जिल्हा