विरोधकांनी घरपट्टीसंदर्भात त्यांच्या मंत्र्यांकडे दाद मागावी;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:54+5:302020-12-12T04:41:54+5:30

पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी डिसेंबर २०१९ अखेर सूचना व हरकतींसाठी वेळ दिला होता. त्यावेळी ...

Opposition groups called for a halt to the protests. | विरोधकांनी घरपट्टीसंदर्भात त्यांच्या मंत्र्यांकडे दाद मागावी;

विरोधकांनी घरपट्टीसंदर्भात त्यांच्या मंत्र्यांकडे दाद मागावी;

googlenewsNext

पत्रकार बैठकीत बोलताना ते म्हणाले, नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी डिसेंबर २०१९ अखेर सूचना व हरकतींसाठी वेळ दिला होता. त्यावेळी १५ हजार ७४७ नागरिकांनी पहिले अपील दाखल केले आहे. त्यानंतर कोविडमुळे दुसरे अपील दाखल करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गर्दी टाळण्याचे बंधन होते. त्यामुळे काही नागरिकांना अपील दाखल करता आले नाही. ही वस्तुस्थिती विरोधकांकडून नजरेआड केली जात आहे.

पाटील म्हणाले, घरपट्टीच्या प्रश्नावर विकास आघाडी आणि मित्रपक्ष शिवसेना संवेदनशील आहेत. सेनेचे नगरसेवक शकील सय्यद यांनी पहिल्यांदा या प्रश्नावर आवाज उठविला आहे. मनसे, संघर्ष समिती, भाजप, रिपाइं अशा सर्व पक्षांनी, घरपट्टीत सवलत देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेऊ.

यावेळी नगरसेवक शकील सय्यद, वैभव पवार, अजित पाटील, भास्कर कदम उपस्थित होते.

चौकट

अपील दाखल करा..

पाटील म्हणाले, मालमत्ता कर अपील सुनावणी समितीचे कामकाज २८ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधित घेण्याचे पत्र समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी नागेश पाटील यांनी पालिकेस दिले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे अपील दाखल करावयाचे राहिले आहे, त्यांनी २७ डिसेंबरपर्यंत आपले अपील दाखल करावे. नागरिकांना निश्चितपणे दिलासा देणार आहोत.

चाैकट

घरपट्टी माफीचा ठराव देतो..

पुण्या-मुंबईनंतर शहरात कोरोनाचे रुग्ण सापडले होते. त्यामुळे अपील समितीचे कामकाज होऊ शकले नाही. आता शहरातील सर्वच नागरिकांना घरपट्टी माफ करावी, असा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये नगराध्यक्ष या नात्याने मांडण्याची माझी तयारी आहे. सभागृहाने त्याला मान्यता देऊन तो शासनाकडे पाठवावा. मंत्रिमंडळात वजन असणाऱ्या त्यांच्या मंत्र्यांनी खास बाब म्हणून ही घरपट्टी माफ करण्याचे धाडस दाखवावे, असेही निशिकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

Web Title: Opposition groups called for a halt to the protests.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.