पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा सांगलीत मोर्चा, 'या' निर्णया विरोधात केली निदर्शने
By संतोष भिसे | Published: October 4, 2022 04:31 PM2022-10-04T16:31:02+5:302022-10-04T16:31:42+5:30
एनसीसी उमेदवारांचा कोटा निश्चित करावा अशी केली मागणी.
सांगली : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत निदर्शने केली. पोलीस भरतीमध्ये एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्यास विद्यार्थ्यांनी विरोध केला.
शासनाने पोलीस भरतीमध्ये एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त साडेसात गुण जाहीर केले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य उमेदवार भरती प्रक्रियेत मागे पडण्याची भिती आहे. शासनाने हा निर्णय मागे घ्यावा अशी उमेदवारांची मागणी आहे. आज, राज्यभरात अनेक जिल्ह्यांत मोर्चे काढून या निर्णयाला विरोध केला. एनसीसी उमेदवारांना अतिरिक्त गुण देण्याऐवजी कोटा निश्चित करावा अशी मागणी केली.
सांगलीत विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे-चौगुले यांना निवेदन दिले. आंदोलनात पोलीस भरतीचे मार्गदर्शक प्रा. रणजीत चव्हाण, मोहसीन बटलर, अशोक गारळे, राहुल कांबळे, अरुण जाधव, विशाल मोहिते, सचिन माळी, अजित माने, इंद्रजित पाटील आदीसह पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.