जयंत पाटील यांच्यामुळे विरोधकांचा 'करेक्ट' कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:43+5:302021-02-27T04:35:43+5:30
ओळ : विटा येथे सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आ. सदाशिवराव पाटील व अॅड. बाबासाहेब ...
ओळ : विटा येथे सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माजी आ. सदाशिवराव पाटील व अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी वैभव पाटील, किरण तारळेकर, किसन जानकर, सचिन शिंदे, किरण तारळेकर उपस्थित होते.
विटा : पालकमंत्री जयंत पाटील यांच्या करेक्ट कार्यक्रमामुळे खानापूर मतदारसंघातील पारे गावचे सुपुत्र दिग्विजय सूर्यवंशी हे सांगलीचे महापौर झाले, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामुळे आगामी काळात विरोधकांचा 'करेक्ट' कार्यक्रम होणार असल्याचे प्रतिपादन विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्यानंतर त्यांचा शुक्रवारी विटा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आ. अॅड. सदाशिवराव पाटील व जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक, तालुका तालुकाध्यक्ष किसन जानकर, उपाध्यक्ष सचिन शिंदे, विनायक कचरे, किरण तारळेकर उपस्थित होते.
यावेळी कार्याध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी काम केल्यामुळेच सांगलीच्या महापौरपदी दिग्विजय सूर्यवंशी यांना संधी मिळाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कुशल नेतृत्वामुळे सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत सत्तांतर घडल्याचे सांगितले.
सांगलीचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, माजी आ. सदाशिवराव पाटील यांनी मार्च २०२० मध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन मी केले होते. कारण मला भविष्यातील खानापूर मतदारसंघाचे आमदार म्हणून ते दिसत होते, पण आता काहीही झाले तरी सदाशिवराव पाटील हेच खानापूरचे आमदार होणार आहेत. यात कोणतीही शंका नाही.
किरण तारळेकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास नगरसेवक फिरोज तांबोळी, अरुण गायकवाड, दहावीर शितोळे, विश्वनाथ कांबळे, लता मेटकरी, रेखा पवार, गजानन निकम, अॅड. सचिन जाधव, प्रशांत कांबळे, गोरख लाटणे यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. उपाध्यक्ष सचिन शिंदे यांनी आभार मानले.