मला मतदारसंघात अडकून ठेवण्याचा विरोधकांचा डाव, पण..; जयंत पाटील यांनी व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 07:19 PM2024-09-04T19:19:06+5:302024-09-04T19:20:27+5:30
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल
इस्लामपूर : आपणास मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षांकडून सर्व प्रकारचे प्रयत्न होणार आहेत. मात्र माझा माझ्या मतदारांवर पूर्ण विश्वास आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी जयंत पाटील यांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याची शपथ शहरातील विविध पदाधिकारी, बूथ अध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी घेतली.
इस्लामपूर येथील शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बूथ अध्यक्षांना निवड पत्रे प्रदान समारंभात बोलत होते. यावेळी सर्वोत्कृष्ट काम केलेल्या पाच बूथ अध्यक्ष व त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रतीक पाटील, यशवंत गोसावी, ॲड. चिमण डांगे, शहाजीबापू पाटील, प्रा. शामराव पाटील, अरुणादेवी पाटील, विजय पाटील, खंडेराव जाधव, संदीप पाटील उपस्थित होते.
विक्रमी मताधिक्य देणाऱ्या बूथना बक्षिसे जाहीर
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृष्णेचे संचालक संजय पाटील, व राजारामबापूचे संचालक शैलेश पाटील यांच्याकडून विधानसभेला विक्रमी मताधिक्य देणाऱ्या बूथना अनुक्रमे १ लाख व ५० हजाराचे बक्षिसे जाहीर केली.
यावेळी यशवंत गोसावी, ॲड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचीही मनोगते झाली. शहाजीबापू पाटील यांनी स्वागत केले. अभिजित रासकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विश्वनाथ डांगे,धैर्यशील पाटील, सुभाष सूर्यवंशी, अरुण कांबळे, सुरेंद्र पाटील, दिग्विजय पाटील, अभिजित कुर्लेकर, शंकरराव चव्हाण, सुस्मिता जाधव, सुनीता देशमाने, दीपाली साधू उपस्थित होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल
आमदार जयंत पाटील म्हणाले, लोकसभा प्रमाणे विधानसभेला ही राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला जनतेचे मोठे पाठबळ मिळणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे. आपले सरकार आल्यानंतर शहरातील, तालुक्यातील उर्वरित विकास कामांना गती देऊ.