हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:26+5:302021-03-20T04:25:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या ...

Order to start Hirabag Water Treatment Plant | हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश

हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्याचे आदेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेला हिराबाग वाॅटर वर्क्समधील जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या सूचना महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. सांगली व कुपवाड शहरातील सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणी मिळेल यासाठी योग्य नियोजन करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांमध्ये अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठ्याबाबत महापौरांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक संजय मेंढे, सागर घोडके, मनगुआबा सरगर, मंगेश चव्हाण, नगरसेविका संगीता हारगे, नर्गिस सय्यद, नसिमा नाईक, स्थाती पारधी, अमर निंबाळकर, उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील, शाखा अभियंता आनंदा वाघमारे, कनिष्ठ अभियंता मुलाणी आदी उपस्थित होते.

सांगली व कुपवाड शहरातील पाणी वितरणचा सखोल आढावा महापौर सूर्यवंशी यांनी यावेळी घेतला. गेल्या काही महिन्यांपासून हिराबाग वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण केंद्र बंद करण्यात आला आहे. तो तात्काळ सुरू करावा. त्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या. शहरातील बऱ्याच पाण्याच्या टाक्यांचे खाली २ ते ३ मुख्य पाइपलाइन जोडण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी नव्या जलवाहिन्यांना नळ कनेक्शन जोडून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

सूर्यवंशी म्हणाले, सांगली व कुपवाड शहरात सर्व भागात किमान २ ते ३ तास मुबलक व पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा झाला पाहिजे याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करावे. त्यासाठी पाइप इन्सेक्टरने ग्रुप तयार करून संबंधित व्हॉल्व्हमन व भागातील सदस्यांचा समावेश करावा. दररोज तक्रारी निकालात काढाव्यात.

चौकट

मिरजेत २४ रोजी बैठक

मिरज शहरातील पाणीपुरवठ्याबाबतही नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा करण्यात आली; परंतु काही नगरसेवक व अधिकारी उपस्थित नसल्याने याबाबत मिरज विभागीय कार्यालयात येत्या २४ मार्च रोजी बैठक होणार असल्याचे महापौर सूर्यवंशी यांनी सांगितले.

Web Title: Order to start Hirabag Water Treatment Plant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.