वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई

By संतोष भिसे | Published: June 17, 2023 09:18 PM2023-06-17T21:18:06+5:302023-06-17T21:18:56+5:30

वारीदरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास, किंवा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण पडू शकतो

Order to continue private hospitals on Varimarga, warning of action against closed hospitals | वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई

वारीमार्गावरील खासगी रुग्णालये सुरु ठेवण्याचे आदेश; बंद रुग्णालयांवर कारवाई

googlenewsNext

सांगली : आषाढी एकादशीनिमित्त आरोग्य विभागाने “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत पालखी मार्गावरील खासगी डॉक्टरांनी रुग्णालये सुट्टी न घेता सुरुच ठेवावीत असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. वारकऱ्यांमध्ये आरोग्याची समस्या उदभवल्यास उपचारांसाठी आरोग्य विभागाने फिरती वैद्यकीय पथके तैनात ठेवली आहेत, पण त्यामध्ये खासगी रुग्णालयांची मदतही महत्वाची आहे असे म्हटले आहे. त्यामुळे वारीदरम्यान ती सुरु ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

वारीदरम्यान रुग्णसंख्या वाढल्यास, किंवा साथीची परिस्थिती निर्माण झाल्यास सरकारी आरोग्य यंत्रणेवर ताण पडू शकतो. त्यामुळे खासगी रुग्णालयांची सेवा आवश्यक ठरते. विशेषत: पंढरपूर शहर व परिसरातील खासगी रुग्णालये सुरु ठेवायची आहेत. ती सुरु असल्याची खात्री करण्यासाठी धडक पथके कार्यरत राहणार आहेत. ठोस कारणाशिवाय रुग्णालये बंद ठेवल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Order to continue private hospitals on Varimarga, warning of action against closed hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.