३०६ डॉक्टरांना नव्याने नेमणुकांचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:24 AM2020-12-08T04:24:12+5:302020-12-08T04:24:12+5:30
सांगली : प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी निवड झालेल्या ३०६ डॉक्टरांना अखेर गुणवत्तेच्या आधारे नियुक्त्या देण्यात आल्या. सोमवारी समुपदेशन प्रक्रियेतून त्यांची ...
सांगली : प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी निवड झालेल्या ३०६ डॉक्टरांना अखेर गुणवत्तेच्या आधारे नियुक्त्या देण्यात आल्या. सोमवारी समुपदेशन प्रक्रियेतून त्यांची उपकेंद्रे निश्चित करण्यात आली. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत त्यांच्या निवडी झाल्या आहेत.
करार तत्त्वावर डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी जिल्हा परिषदेला मान्यता मिळाली होती. त्यातून ३०६ डॉक्टरांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात आली. प्रशिक्षणही दिले. परीक्षेतील गुणांच्याआधारे त्यांच्या नेमणुका अपेक्षित होत्या, पण तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी महिला डॉक्टरांविषयी सहानुभूतीने विचार करत महिलांच्या नियुक्त्यांना प्राधान्य दिले.
यामुळे बरेच वादंग झाले. समुपदेशनाच्या प्रक्रियेत सहाजण कोरोनाबाधितही आढळले.
डॉक्टरांनी नेमणुकांना आव्हान देत राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आयुक्तांकडे दाद मागितली. त्यांनी गुणवत्तेच्याआधारे नेमणुकांचे आदेश दिले. त्यानुसार डॉक्टरांना पुन्हा समुपदेशनासाठी पाचारण करण्यात आले. सोमवारी नेमणुका देण्यात आल्या.
----------------