संघटित व्हा, संघर्ष करा : प्रेमकुमार बोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:24 AM2021-05-15T04:24:47+5:302021-05-15T04:24:47+5:30
इस्लामपूर : मराठा समाज अंधश्रद्धा व कुप्रथांना बळी पडून अल्पभूधारक व अर्थहिन बनला आहे. म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे. ...
इस्लामपूर : मराठा समाज अंधश्रद्धा व कुप्रथांना बळी पडून अल्पभूधारक व अर्थहिन बनला आहे. म्हणून त्याला आरक्षणाची गरज आहे. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हाच मूलमंत्र त्याने जपला पाहिजे, असे उद्गार प्रसिद्ध विचारवंत प्रेमकुमार बोके यांनी काढले. ते मराठामोळा युवक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत बोलत होते.
ते म्हणाले, महाराष्ट्र म्हणजे मराठा अशी ओळख असणाऱ्या मराठा समाजाची ओळख करून घ्यायची असेल तर हजारो पाने अपुरी पडतील. एवढे कार्यकर्तृत्व मराठा समाजाचे आहे. आजही काही मराठा व्यक्ती स्वकर्तृत्वाने विविध क्षेत्रात भरीव काम करीत असले तरी बहुसंख्य मराठा समाजाची परिस्थिती हलाखीची आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच विचार मांडताना तानाजीराव देशमुख म्हणाले, मराठा समाजाला आज संघटित होण्याची गरज आहे. मराठा समाजातील दानशूर व्यक्तींकडून मराठा फंड तयार करावं लागेल.
रणजित जाधव यांनी आभार मानले. प्रा.विजयराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरेंद्र पाटील, राकेश पाटील, अभिजित पाटील, महेश कळसकर, अतुल पाटील यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.