सांगलीत रक्तदान शिबिराचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:27 AM2021-04-09T04:27:58+5:302021-04-09T04:27:58+5:30
सांगली : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, डॉ. शिरगावकर रक्तपेढी, सरकार ग्रुप, विसावा मंडळ व कृष्णामाई जलतरण संस्था यांच्या वतीने रविवारी, ...
सांगली : इंडियन रेडक्रॉस सोसायटी, डॉ. शिरगावकर रक्तपेढी, सरकार ग्रुप, विसावा मंडळ व कृष्णामाई जलतरण संस्था यांच्या वतीने रविवारी, दि. ११ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
गावभाग विसावा चौक येथील म्हैसकर हॉलमध्ये रविवारी सकाळी ९ ते दुपारी २ यावेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. याबाबत संजय चव्हाण म्हणाले की, सध्या कोविड काळात व लसीकरण सुरू असल्याने रक्ताचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. वाढती रुग्णसंख्या, नियमित रक्ताची गरज असणारे रुग्ण यांचा विचार केल्यास रक्ताअभावी मोठी समस्या निर्माण होऊ पाहत आहे. त्यामुळे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. दात्यांनी शिबिरात रक्तदान करून एक अमोल जीव वाचवावा, असे आवाहन त्यांनी केले.