सांगलीत उद्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:41 AM2020-12-12T04:41:50+5:302020-12-12T04:41:50+5:30
सर्वात मोठ्या रोख ५५ हजार रुपये पारितोषिकाची ही स्पर्धा १३ रोजी सायंकाळी सात वाजता खेळली जाणार आहे. स्पर्धेची वेळ ...
सर्वात मोठ्या रोख ५५ हजार रुपये पारितोषिकाची ही स्पर्धा १३ रोजी सायंकाळी सात वाजता खेळली जाणार आहे. स्पर्धेची वेळ दीड तास आहे. प्रत्येक डाव तीन मिनिटे असणार आहे. या स्पर्धेत खुल्या गटासाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये, व्दितीय तीन हजार रुपये, तृतीय दोन हजार रुपये, चतुर्थ १५०० रुपये, पाचव्या क्रमांकास १२५० रुपये अशी एकूण १२१ पारितोषिके आहेत.
फिडे रेटिंगनुसार एकूण ७५ पारितोषिके, एक हजार ते १३०० रेटिंग, १३०१ ते १६००, १६०१ ते १९०० आणि १९०१ ते २२०० करिता प्रत्येक गटासाठी प्रत्येकी १५ पारितोषिके तसेच उत्कृष्ट महिला खेळाडूकरिता पाच पारितोषिके, वयोगट ८, ११, १४, १७ वर्षाखालील प्रत्येकी १० अशी एकूण ४० पारितोषिके आहेत. संपूर्ण भारतातील राज्यांसाठी पूर्व, पश्चिम, दक्षिण व उत्तर विभागाकरिता प्रत्येकी एकूण ६० पारितोषिके आहेत. उत्कृष्ट महाराष्ट्राकरिता एकूण २५ पारितोषिके आहेत.
या स्पर्धा नगरसेवक संतोष पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंच यांनी पुरस्कृत केल्या आहेत. मंगेश येडूरकर, केपीएस चेस ॲकॅडमी संचालक विजयकुमार माने यांच्या सहकार्याने आयोजित केल्या आहेत. स्पर्धेचे संयोजन फिडे पंच पौर्णिमा उपळावीकर- माने करीत आहेत. पंच म्हणून मुख्य आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी (रत्नागिरी), तर तांत्रिक पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच आनंदबाबू (चेन्नई), आंतरराष्ट्रीय पंच स्वप्नील बनसोड ( नागपूर ), फिडे पंच दीपक वायचळ, शार्दुल तपासे, आनंदिता प्रदीप (सातारा) हे काम पाहणार आहेत.