दिव्यांगासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:29 AM2021-08-13T04:29:54+5:302021-08-13T04:29:54+5:30

सांगली : शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ...

Organizing training programs for the disabled | दिव्यांगासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

दिव्यांगासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

googlenewsNext

सांगली : शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगासाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. या संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या आठवी उत्तीर्ण दिव्यांगांसाठी संगणक कोर्स, मोटार रिवायंडिंग यासह इतर प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली.

----------

माजी सैनिकांसाठी तलाठी भरती

सांगली : धुळे व नंदुरबार जिल्ह्यामध्ये माजी सैनिक उमेदवार मिळत नसल्याने तलाठी पदे रिक्त आहेत. अनुसूचित जमातीची आठ, तर पेसाचे १ पद रिक्त आहे. तरी पदांवर नियुक्तीकरिता अर्ज करण्यास इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कार्यालय, सांगली येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

---------

माजी सैनिकांच्या पाल्यासाठी योजना

सांगली : केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्लीद्वारा माजी सैनिका/विधवांच्या पाल्यांची आर्थिक मदतीसाठीच ऑनलाइन प्रकरणे सादर करण्याची प्रक्रिया जाहीर करण्यात आली. त्यानुसार इयत्ता पहिली ते नववी व अकरावीची प्रकरणे दिनांक ३० सप्टेंबरपर्यंत, दहावी, बारावी ३१ ऑक्टोबरपर्यंत आणि पदवीपूर्व ३० नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरावीत, अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी दिली.

---------------

सैनिक वसतिगृहात पदांची भरती

सांगली : जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांच्या आधिपत्याखाली सैनिकी वसतिगृहातील पहारेकरी या पदावर सैनिक संवर्गातून अर्ज मागविण्यात येत आहेत. या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास नागरी उमेदवारांचा विचार करण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी सैनिक कल्याण कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------

सोल्जर ट्रेडमन पदासाठी भरती

सांगली : इन्फट्री बटालियन ईको महार यांच्या वतीने सोल्जर जी.डी. सोल्जर ट्रेडमेन आणि क्लार्क या पदांकरिता माजी सैनिक व वन विभागातील माजी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सांगली यांनी केले आहे.

Web Title: Organizing training programs for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.