...अन्यथा पंचायत राज समितीला काळे झेंडे दाखवू सकल मराठा शौर्यपीठाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 12:32 AM2018-08-26T00:32:51+5:302018-08-26T00:38:44+5:30
राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर
कोल्हापूर : राज्य शासनाची पंचायत राज समिती येत्या काही दिवसांत जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. या समितीने मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका शिवाजी चौकात सुरू असलेल्या सकल मराठा शौर्यपीठाच्या आंदोलनस्थळी येऊन जाहीर करावी; अन्यथा त्यांना काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा शौर्यपीठाच्या प्रसाद जाधव, राजू जाधव, जयदीप शेळके, उदय लाड यांनी शनिवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिवाजी चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. येथे शनिवारी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्टवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्यासह चाणक्य मार्शल आर्टस असोसिएशनचे प्रशिक्षक संदीप लाड व आंतरराष्टÑीय पदक विजेच्या खेळाडूंनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
दरम्यान, सकल मराठा शौर्यपीठातर्फे जिल्हा दौºयावर येणाºया पंचायत राज समितीला प्रसिद्धिपत्रकाद्वारे इशारा देण्यात आला आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यभर धगधगत असताना ही समिती दौैºयावर येत आहे. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून, तो तातडीने सोडविण्याची गरज आहे. सरकारने या संवेदनशील प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या समितीमध्ये विविध पक्षांचे आमदार, शासकीय अधिकारी व तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका शिवाजी चौकातील आंदोलनस्थळी येऊन जाहीर करावी; अन्यथा या समितीला काळे झेंडे दाखविण्यात येतील, असा इशारा या प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आला.आंदोलनात दीपा पाटील, प्रकाश सरनाईक, बबन चावरे, राजेंद्र चव्हाण, राहुल इंगवले, शिवाजीराव लोंढे, आदी सहभागी झाले होते.
मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकामध्ये शनिवारी संध्याकाळी महाआरती करण्यात आली. यावेळी महेश जाधव, सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, अजित राऊत, विक्रम जरग, श्रीकांत भोसले, राजेंद्र चव्हाण, शरद तांबट, अशोकराव जाधव, आदी उपस्थित होते.