आमचीच शिवसेना ओरिजनल; शंभूराज देसाईंचे ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर
By प्रमोद सुकरे | Published: January 23, 2024 09:18 PM2024-01-23T21:18:26+5:302024-01-23T21:18:55+5:30
शिवसेना फुटलेली नाही, ओरिजनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असल्याचे सांगितले आहे.
कराड- आम्ही शिवसेना पळवली नाही, शिवसेना फुटली नाही. उलट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वांच्या विचारांशी प्रतारणा कोणी यांचा विचार करावा. असा उपरोधिक सल्ला ठाकरेंना मंत्री शंभूराज देसाईंनी दिला .तर आमचीच शिवसेना ओरीजनल असल्याचे सांगितले.कराड येथील उपजिल्हा रूग्णालयातील सी टी स्कॅन मशिनच्या लोकार्पण सोहळ्यास पालकमंत्री शंभूराज देसाई आले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
देसाई म्हणाले, शिवसेना फुटलेली नाही, ओरिजनल शिवसेना कायद्याने घटनेने आणि ज्यांना शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार आहे त्या केंद्रीय निवडणूक आयोगाने आमची शिवसेना खरी असल्याचे सांगितले आहे. उबाठा गटाची मंडळी कोर्टात गेली, कोर्टानेही त्याचे ऐकले नाही. राज्य न्यायाने, घटनेने आणि कायद्याने चालते. आम्ही कायद्याच्या चाैकटीत राहून योग्य निर्णय घेतलेला आहे.
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारपासून सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी अडीच वर्ष बाजूला गेले. बाळासाहेबांचे जे काॅंग्रेस बाबतचे विचार होते, त्याच्या उलट कृती उबाठा गटाने केली. सत्तेसाठी ज्याच्या विरोधात लढले त्याच्या सोबत सत्तेत जावून बसले. त्यामुळे शिवसेनेच्या आणि शिवसेना प्रमुखांच्या ज्वलंत हिदुत्वाच्या विचारांशी कोणी प्रतारणा केली आहे, याचं आत्मपरीक्षण ठाकरे गटाने करावं असा उपरोधिक सल्ला शंभूराज देसाईंनी दिला आहे.