अंधश्रद्धेतून रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:20 AM2021-06-06T04:20:43+5:302021-06-06T04:20:43+5:30

टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे अंधश्रद्धेतून १५ दिवसांच्या रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळल्याचा प्रकार घडला. यामुळे प्राणीप्रेमींमधून ...

Out of superstition, Redya's stain removed her eyes and burned her ears | अंधश्रद्धेतून रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळले

अंधश्रद्धेतून रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळले

Next

टाकळी : टाकळी (ता. मिरज) येथे अंधश्रद्धेतून १५ दिवसांच्या रेड्याचे डागणीने डोळे काढून कान जाळल्याचा प्रकार घडला. यामुळे प्राणीप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे. ॲनिमल राहत संस्थेने या रेड्याला उपचारासाठी नेले आहे.

ग्रामीण भागामध्ये अंधश्रद्धेतून देवांच्या नावे रेडा व बोकड सोडण्याची पद्धत आहे. यातून पंधरा दिवसांच्या रेड्याचे डोळे व कान जाळून त्याला टाकळी-बोलवाड येथील ओढ्यात दोन दिवसांपूर्वी अज्ञातांनी सोडून दिले. डोळे डागणीने जाळण्यात आल्याने रेडा पूर्णपणे अंध झाला आहे. तो इकडे-तिकडे फिरत असताना, टाकळी येथील शेतकरी सचिन कोठावळे यांच्या लक्षात हा अघोरी प्रकार आला. त्यांनी याबाबत बाळासाहेब पाटील यांना माहिती दिली व त्या रेड्याला घेऊन घरी आले. बाळासाहेब पाटील यांनी ॲनिमल राहत संस्थेचे किरण नाईक, दिलीप शिंगणे यांना पाचारण करून जखमी रेड्याला त्यांच्या ताब्यात दिले. पंधरा दिवसांच्या रेड्याचे डोळे काढून त्याचे कान जाळणे हा अघोरी प्रकार विशिष्ट जमातीत केला जातो. अशा अघोरी प्रकारातून जनावरांना वेदना पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी किरण नाईक व बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.

Web Title: Out of superstition, Redya's stain removed her eyes and burned her ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.