जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक; १,८३३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:21+5:302021-05-06T04:29:21+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल १,८३३ नवे रुग्ण आढळले असून, परजिल्ह्यातील ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. बुधवारी एकाच दिवसात तब्बल १,८३३ नवे रुग्ण आढळले असून, परजिल्ह्यातील १४ जणांसह जिल्ह्यातील ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. १,१४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका क्षेत्रासह जत, मिरज तालुक्यांत २७० च्यावर रुग्ण आढळले आहेत.
बाधितांच्या विक्रमी संख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. जिल्ह्यातील ४४ जणांचा मृत्यू झाला असून, यात सांगलीतील ६, मिरज ४, कुपवाड २, वाळवा तालुक्यात ६, तासगाव ५, कडेगाव, खानापूर, शिराळा तालुक्यात प्रत्येकी ४, जत, पलूस प्रत्येकी ३, तर मिरज तालुक्यात २, कवठेमहांकाळ तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे. मिरज तालुक्यात २९०, जतमध्ये २७०, तर महापालिका क्षेत्रातही २७१, अशा मोठ्या संख्येने रुग्ण आढळले आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरअंतर्गत २,५५० जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८७५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँटिजनच्या ४,२३५ जणांच्या चाचणीतून १,०३६ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या १४ हजार ७४६ रुग्णांपैकी २,३५७ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील २,१२१ जण ऑक्सिजनवर, तर २३६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १४ जणांचा मृत्यू झाला असून, ७८ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक २४ जणांचा समावेश आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ८३,३१९
उपचार घेत असलेले १४,७४६
कोरोनामुक्त झालेले ६६,१००
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २,४७३
बुधवारी दिवसभरात
सांगली १३९
मिरज १३२
मिरज तालुका २९०
जत २७०
तासगाव १५९
कवठेमहांकाळ १५६
वाळवा १४४
आटपाडी १३६
खानापूर १२१
कडेगाव ११९
पलूस ८९
शिराळा ७८