कोरोना ‘हेल्पलाइन’वर आतापर्यंत दोन हजारांवर कॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:28 AM2021-04-20T04:28:40+5:302021-04-20T04:28:40+5:30

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधितांना उपचारासाठी वेळेत माहिती मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकास चांगला प्रतिसाद मिळत ...

Over 2,000 calls to the Corona Helpline so far | कोरोना ‘हेल्पलाइन’वर आतापर्यंत दोन हजारांवर कॉल्स

कोरोना ‘हेल्पलाइन’वर आतापर्यंत दोन हजारांवर कॉल्स

googlenewsNext

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधितांना उपचारासाठी वेळेत माहिती मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या या कॉलसेंटरवर आतापर्यंत १९४० कॉल्स आले आहेत.

कोरोनाबाधितांसह नातेवाइकांना उपलब्ध बेडची माहिती देण्यासह लसीकरणाचीही माहिती या सेंटरमधून देण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपासून बेड मॅनेजमेंट कॉलसेंटर सुरू असून आतापर्यंत एक हजार ९४० तर गेल्या १० दिवसांत दररोज ३०० कॉल आले आहेत.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांचीही खात्री करून घेण्यासाठी वेगळे कॉलसेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना जिल्हा परिषदेमधून दररोज कॉल करून माहिती घेतली जात आहे. या सेंटरमध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सेंटरचा रुग्णांच्या नातेवाइकांना चांगला उपयोग होत आहे.

Web Title: Over 2,000 calls to the Corona Helpline so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.