पूरग्रस्त छोटे व्यावसायिकच्या मदतीसाठी 63 कोटीहून अधिक रक्कम बँकेत जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:27 PM2019-11-12T16:27:20+5:302019-11-12T16:38:15+5:30
छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे.
सांगली : छोटे गॅरेज, छोटे उद्योग व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक, हातगाडीधारक अशा 16016 पूरग्रस्त लाभार्थ्यांसाठी 63 कोटी 05 लाख 75 हजार 98 रूपये इतकी रक्कम तहसिल कार्यालयाकडून बँकेत जमा केलेली आहे.
यापैकी 15 हजार 786 लाभार्थ्यांच्या खात्यावर 61 कोटी 44 लाख 72 हजार 242 रूपये इतकी रक्कम 11 नोव्हेंबर अखेर बँकेकडून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर त्वरीत जमा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.
पूरबाधित 88 हजार 600 कुटूंबापैकी 85 हजार 808 कुटूंबाना 42 कोटी 90 लाख 40 हजार रूपये अनुदान रोखीने देण्यात आले आहे. तर बँक खात्यावर मिरज तालुक्यातील 54 हजार 719 बाधित कुटूंबांपैकी 50 हजार 513 कुटूंबांना 43 कोटी 55 लाख 70 हजार रूपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.
पलूस 8 कोटी 95 लाख 20 हजार, शिराळा तालुक्यात 3 कोटी 6 लाख 5 हजार, वाळवा तालुक्यात 5 कोटी 90 लाख 95 हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आली आहे. अशी माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.
तात्पुरत्या निवाऱ्यासाठी घरभाडेपोटी ग्रामीण भागातील 8425 कुटूंबापैकी 2249 कुटुंबाना 5 कोटी 39 लाख 76 हजार रूपये व शहरी भागातील 388 कुटुंबापैकी 243 कुटूंबांना 87 लाख 48 हजार रूपये अनुदान वाटप करण्यात आले आहे.
पूरबाधित कुटूंबांना निर्वाह भत्ता प्रति प्रौढ व्यक्तीस 60 रूपये व प्रति बालकास 45 रूपये या प्रमाणे मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यातील एकूण 88 हजार 600 बाधित कुटुंबातील 1 लाख 71 हजार 171 प्रौढ व्यक्ती व 45 हजार 334 बालकांना एकूण 11 कोटी 60 लाख 12 हजार 340 रूपये निर्वाह भत्ता वाटप करण्यात आला आहे.
माहे ऑगस्ट मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 81 हजार 513 कुटुंबांना 8151.3 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे. माहे सप्टेंबर मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 52 हजार 811 कुटुंबांना 5281.1 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे. माहे ऑक्टोंबर मध्ये पूरबाधित 88 हजार 33 कुटूंबापैकी 52 हजार 814 कुटुंबांना 5281.4 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ वाटप करण्यात आले आहे.
बारा बलुतेदार/छोटे व्यवसायिक/दुकानदार/टपरीधारक यांना मानकानुसार 1158 लाभार्थ्यांची रु 92 लाख 86 हजार 650 इतकी रक्कम खात्यावर जमा करण्यात आली असून उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. हस्तकला/बाराबलुतेदार 1174 लाभार्थ्यांचे 3 कोटी 63 लाख 67 हजार 978 इतके अनुदान खातेवर जमा करण्यात आले आहे. अशीही माहिती प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी दिली आहे.