जल आराखड्यातून टंचाईवर मात

By admin | Published: March 20, 2016 10:35 PM2016-03-20T22:35:45+5:302016-03-20T23:48:19+5:30

सांगली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८,६०,८०७ हे. असून, एकूण १० तालुके, ६० महसूल मंडळे व ७३९ गावे समाविष्ट आहेत.

Overcoming the scarcity of the water plot | जल आराखड्यातून टंचाईवर मात

जल आराखड्यातून टंचाईवर मात

Next


सांगली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ८,६०,८०७ हे. असून, एकूण १० तालुके, ६० महसूल मंडळे व ७३९ गावे समाविष्ट आहेत. जिल्ह्याचे लागवडीलायक क्षेत्र ६८१६१४ हे. असून अवर्षणप्रवण क्षेत्र ५७१२६२ इतके आहे. पूर्व भागातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे तीन तालुके पूर्णत: अवर्षणप्रवण व खानापूर, तासगाव, पलूस, मिरज व कडेगाव हे ५ तालुके अंशत: अवर्षणप्रवण क्षेत्रातील आहेत. उर्वरित शिराळा व वाळवा हे दोन पश्चिमेकडील तालुके अवर्षणप्रवण भागात येत नाहीत. सांगली जिल्ह्याचे संपूर्ण क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यात येते. या जिल्ह्यात वारणा, येरळा, अग्रणी या कृष्णा नदीच्या उपनद्या, तसेच माण व बोर या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० मि.मी. ते ६२५० मि.मी. (पश्चिम भागात) इतके पाऊसमान असून, ज्वारी, गहू, मका, भुईमूग, कापूस, द्राक्षे व ऊस ही प्रमुख पिके घेतली जातात.
गावनिहाय जल आराखडा करण्यासाठी सांगली पाटबंधारे मंडळाने जिल्ह्याचा, प्रत्येक जल आराखडा तयार करुन जिल्ह्यातील ७३९ गावांचा जल आराखडा तयार केला आहे.
जिल्ह्यामध्ये जलसंपदा विभागाकडील ४ मोठे, ७ मध्यम, ९२ ल.पा. प्रकल्प असून या प्रकल्पांचे एकूण लाभक्षेत्र ४.२२ लाख हे. व पाणी वापर/साठवण क्षमता ८४ अ. घ.फू. (टीएमसी) आहे. तसेच स्थानिक स्तर / जलसंधारण / जिल्हा परिषद / कृषी या विभागांकडील ल. पा. / को. प. बंधारे / सिंमेंट बंधारा / पाझर तलाव / साठवण तलाव यांची संख्या २९६० इतकी असून त्याची सिंंचन क्षमता 0.२९ लाख हे. व पाणी वापर/साठवण क्षमता ५.१७ टीएमसी इतकी आहे. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील एकूण भूजलाचा साठा ३१.५५ टीएमसी आहे. याप्रमाणे जिल्ह्याची एकूण सिंंचन क्षमता ४.५१ लाख हे. व पाणी वापर/साठवण क्षमता १२०.७६ टीएमसी इतकी आहे. यापैकी वापरासाठी उपलब्ध होणारे पाणी ८४.५३ टीएमसी इतके आहे. प्रत्येक तालुक्यात पाण्याची उपलब्धता, प्रत्यक्ष हेक्टर वापरासाठी किती पाणी उपलब्ध होईल, यादृष्टीने करण्यात आली आहे.
जत तालुक्यात सिंंचनासाठी प्रति हे. १८०६ घनमीटर (१८० टँकर) इतकेच पाणी सिंंचनासाठी उपलब्ध होते.
प्रत्येक गावासाठी नियोजनानुसार सर्व स्रोतातून पाणी उपलब्धता काढण्यात आली आहे. या प्रत्येक गावात उपलब्ध होणारे पाणी व गावाचे क्षेत्र याचा विचार करुन पिण्याचे पाणी राखून ठेवूनच सिंंचनाचे नियोजन करणे आवश्यक आहे. ज्या गावांत भूजलासह सिंंचनासाठी २००० घनमीटर हेक्टरीपेक्षा कमी पाणी आहे, तिथे अति तुटीचे (भूपृष्ठावरील १५०० घ.मी./हे.पेक्षा कमी) गाव असे वर्गीकरण होते. ज्या गावात सिंंचनासाठी ३५०० घ.मी./हे. पाणी उपलब्ध आहे, तिथे तुुटीचे व त्यापेक्षा जास्त पाणी असलेल्या गावाचे सर्वसाधारण विपुल, असे वर्गीकरण करण्यात आले आहे. ४४४



अ.तालुकालागवडीयोग्य एकूण पाणी एकूण पाणी प्रति. हेक्टर क्षेत्राचे वर्गीकरण
क्र. लक्ष हेक्टरउपलब्धता वापरउपलब्ध पाणी
पिण्यासाठीसिंचन(घ.मी.)
१शिराळा0.३१४.९१०.२१४.७०४२२३ सर्वसाधारण
२वाळवा0.६४१३.२१०.६४१२.५७५१४७सर्वसाधारण
३पलूस0.२५३.९९०.२१३.७८४३३४ सर्वसाधारण
४कडेगाव0.४९७.0३०.१८६.८५३९७६ सर्वसाधारण
५खानापूर0.५६६.५३०.२४ ६.२९३०७६ तुटीचे
६तासगाव0.७२९.७८०.३५९.४३३६९८ सर्वसाधारण
७मिरज0.७९१२.८२१.३४११.४८४१२१ सर्वसाधारण
८कवठेमहांकाळ0.४७६.९६०.२१६.७५४०६८सर्वसाधारण
९आटपाडी0.५९७.१००.१८६.९२२६९३तुटीचे
१०जत१.८५१२.२२०.४२११.८०१८०६अति तुटीचे
एकूण६.६८८४.५५३.९९८०.५७३३३१ तुटीचे

Web Title: Overcoming the scarcity of the water plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.